Posts

Showing posts from 2018

आमचेही ZNMD

 (लोकमत ‘ऑक्सिजन’ पुरवणीसाठी लेख) तीन देशांतल्या चार शहरांतल्या आठ जणींची एक अविस्मरणीय सहल “म्हणालो होतो की नाही आपण की लेख लिहायला पाहिजे आपल्या ह्या अनुभवाबद्दल? आज संधी आली आहे तो लेख लिहिण्याची”. मला आमच्या स्पेन च्या ट्रिपबद्दल लिहायला सांगितल्यावर मी सगळ्यांना मेसेज केला, सगळ्या परत ३ वर्ष मागे गेल्या…. कल्पना सुचली आम्ही सगळ्या म्हणजे अनू, शलाका, आरती, अदिती, नंदिता, शिल्पा, हेमा आणि केतकी कॉलेजमधे BCS ला एका वर्गात होतो. कॉलेज संपून २० वर्ष झाली तरी आधी ई-मेल, yahoo group आणि नंतर whatsapp आणि facebook वरून जास्त मैत्रिणी झालो. सगळ्या वेगवेगळ्या देशात विखुरलेल्या पण पुण्यात भेटत राहिलो. आणि अशातच एकदा अदिती कामानिमित्त U.K ला गेली असताना शलाकाकडे गेली होती. त्यांच्या बोलण्यात विषय निघाला की आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी जाऊया. हा धागा पकडून ती परत आल्यावर आमच्या गप्पा रंगल्या आणि आम्ही खरंच ह्याचा विचार करू लागलो. दोघी जणी अमेरिकेत, एक U.K मध्ये, बाकी पाच पुण्यात. कोणालाच फार जास्त प्रवास करावा लागू नये म्हणून युरोपला जाण्याचा विचार केला. बाकी काही देश काहीजणींचे बघून झा...